​BCCI कडून टीम इंडियाच्या होम सीजनचं बिगुल वाजलं! वेस्ट इंडिजपासून ऑस्ट्रेलियापर्यंत… असा आहे संपूर्ण कार्यक्रम!

क्रिकेट वेड्यांनो, तयार आहात का? कारण टीम इंडियाच्या घरच्या मैदानावरील (Home Series) सामन्यांची घोषणा झाली आहे आणि हे वेळापत्रक पाहून एक गोष्ट स्पष्ट आहे – पुढचे सहा महिने फक्त आणि फक्त क्रिकेटचा धिंगाणा असणार आहे!
BCCI ने नुकतंच टीम इंडियाचं घरच्या मैदानावरचं वेळापत्रक जाहीर केलंय. यामध्ये टी-२० चा थरार आहे, वन-डेची रंगत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’चा (BGT) महासंग्राम सुद्धा आहे. चला तर मग, तुमच्या कॅलेंडरमध्ये तारखा मार्क करून ठेवा!

Team इंडिया: होम सिरीज

वेस्ट इंडिजचा भारत दौरा (२७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर)

सीजनची सुरुवात होणार आहे कॅरेबियन पॉवरसोबत. वेस्ट इंडिजचा संघ भारतात येत आहे. हे सामने सणासुदीच्या काळात येत असल्याने चाहत्यांसाठी ही एक मोठी पर्वणीच असेल. वेस्ट इंडिजचे खेळाडू आणि त्यांचे लांबच लांब षटकार पाहायला नक्कीच मजा येईल, तसेच भारताने T20 वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिज चा पराभव करून त्यांना स्पर्धेबाहेर केले होते. ते अजून विसरले नसतील त्यामुळे ही सिरीज नक्कीच जोरदार होणार यात शंका नसेल.

श्रीलंका मालिका (१३ डिसेंबर ते २७ डिसेंबर)

इंडिया v श्रीलंका

डिसेंबरच्या गुलाबी थंडीत शेजारील श्रीलंका संघ भारतासोबत भिडणार आहे. श्रीलंका संघ सध्या आशियाई संघ असल्याने दोन्ही टीम्समध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळेल. श्रीलंका संघ सध्या ट्रानसिशन फेज मध्ये आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा दौरा महत्वाचा ठरेलं.

झिम्बाब्वे मालिका (३ जानेवारी ते ९ जानेवारी)

इंडिया v झिम्बावे

नवीन वर्षाची सुरुवात ‘झिम्बाब्वे’ विरुद्धच्या शॉर्ट आणि स्वीट मालिकेने होईल. जरी ही मालिका छोटी असली तरी, नवीन टॅलेंटला आजमावण्यासाठी ही एक उत्तम संधी असेल. तसेच झिम्बावे साठी सुद्धा ही सिरीज महत्वाची आहे कारण त्यांना देखील आंतरराष्ट्रीय स्थरावर आपलं नाव प्रस्थापित करायचे आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी: वर्षातील सर्वात मोठी लढत (२१ जानेवारी ते २७ फेब्रुवारी)

BGT 🏏

आणि शेवटी येणार आहे ‘मेन इव्हेंट’! भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया म्हणजे क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी खुन्नस. २१ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात असेल. 2024-25 मध्ये झालेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी मध्ये भारताला 3-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टेस्ट मधून रिटायरमेंट घेतली.

आता ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर येणार आहे तेंव्हा शुभमन गिल च्या नेतृत्वात भारतीय टेस्ट संघ कशी कामगिरी करतो हे बघणे औचित्यचे ठरेलं. शुभमन गिल च्या नेतृत्वात भारताने इंग्लंड मध्ये जाऊन टेस्ट सिरीज 2-2 ने बरोबरीत सोडली असली तरी दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारतात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे ही सिरीज WTC च्या दृष्टीने महत्वाची आहे.

तर क्रिकेट वेड्या भावांनो तुम्ही कोणत्या सिरीज साठी उत्साहित आहात आम्हाला नक्की कळवा..