IPL 2026: आरसीबी विरुद्ध चेन्नई महासंग्राम! चिन्नास्वामीवर कोणाचे पारडे जड? वाचा सविस्तर विश्लेषण

दिनांक: ५ एप्रिल २०२६ | वेळ: संध्याकाळी ७:३० | ठिकाण: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

आयपीएल २०२६ चा ११ वा सामना आज बेंगळुरूच्या ऐतिहासिक चिन्नास्वामी मैदानावर खेळला जाणार आहे. एकीकडे सलग दोन सामने गमावून विजयासाठी आसुसलेला ऋतुराज गायकवाड चा चेन्नई संघ आहे, तर दुसरीकडे हैदराबादला हरवून फॉर्मात असलेला रजत पाटीदारचा बंगळूर संघ. ही केवळ एक मॅच नसून दोन्ही संघांच्या चाहत्यांसाठी अस्मितेची लढाई आहे.

१. चेन्नई सुपर किंग्सची रणनीती (CSK Strategy)

चेन्नईसाठी या हंगामाची सुरुवात निराशाजनक झाली आहे. आजच्या सामन्यासाठी चेन्नई खालील विशेष रणनीती आखू शकते:

  1. संजू सॅमसनचा फॉर्म: चेन्नईसाठी कर्णधार संजू सॅमसनचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. RR मधून ट्रेड होऊन आल्यानंतर पहिल्यांदाच पिवळी जर्सी घातलेल्या संजू ला अजून फॉर्म सापडला नाही.आज त्याला ऋतुराज गायकवाड सोबत मोठी खेळी करून डावाला आकार द्यावा लागेल.
  2. पॉवरप्लेमध्ये विकेट्स: आरसीबीची सलामीची जोडी (कोहली आणि सॉल्ट) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्यांना लवकर बाद करण्यासाठी चेन्नई आपल्या वेगवान गोलंदाजांचा वापर आक्रमकपणे करावा लागेल. चेन्नई आपला लेफ्ट हँडेड स्पिनर अखिल हुसेन ला सुद्धा यावेळेस चान्स देऊ शकतो कारण RCB चे दोन्ही ओपनर right हँडेड आहेत. हुसेन त्यांना नक्की परेशान करू शकतो.
  3. स्पिनर्सचा वापर: नूर अहमद आणि राहुल चहर यांना मधल्या ओव्हर्समध्ये आरसीबीच्या धावगतीला लगाम घालावा लागेल. चिन्नास्वामीची छोटी बाउंड्री पाहता, लेग-स्पिनर्सची भूमिका महत्त्वाची ठरेल.
  4. डेथ ओव्हर्स: चेन्नई कडे आता पथीराणा नसल्यामुळे त्यांना शेवटच्या ओव्हर मध्ये RCB ला थांबवण्याचे मोठे लक्ष असणार आहे. RCB कडे मोठे पॉवर हिटर आहेत त्यामुळे शेवटच्या क्षणाला जास्त रन्स जाऊ न देणे याकडे चेन्नई चे लक्ष असेल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरची ताकद (RCB Strategy)

  1. विराट कोहलीचा आक्रमक अवतार: विराट कोहली या हंगामात वेगळ्याच अंदाजात फलंदाजी करत आहे. हैद्राबाद विरुद्ध त्याने मॅच विनिंग इंनिंग खेळून नाबाद राहिला होता. चिन्नास्वामीवर त्याचे रेकॉर्ड्स पाहता, तो चेन्नईच्या गोलंदाजांची डोकेदुखी ठरू शकतो.
  2. मधली फळी : RCB ची मधली फळी ही खूप स्ट्रॉंग आहे. देवदत्त पडिकल, पाटीदार, शेपर्ड, टीम डेव्हिड अश्या पॉवर हिटर च्या जोरावर RCB समोरच्या टीम चे सगळे प्लॅन उध्वस्त करू शकते.
  3. सुधारलेली गोलंदाजी: जॅकब डफी, भुवनेश्वर कुमार, क्रुणाल पांड्या यांनी मागील सामन्यात चांगली कामगिरी केली आहे. भुवी ने संजू सॅमसन ला 4 वेळेस आऊट केले आहे त्यामुळे या दोघांतील कॉम्पिटिशन बघण्यासारखी असेल.घरच्या मैदानावर प्रेक्षकांचा पाठिंबा आरसीबीसाठी १२ व्या खेळाडूचे काम करेल.

हेड टू हेड आकडेवारी (RCB vs CSK Head-to-Head)

दोन्ही संघांमधील आतापर्यंतचा रेकॉर्ड पाहिला तर चेन्नईचे पारडे जड दिसते, पण अलीकडच्या काळात आरसीबीने चांगली टक्कर दिली आहे.

CSK vs RCB : Head to Head

Head to Head मध्ये चेन्नई चे पारडे जड वाटत असले तरी मागील 3 सामन्यात RCB ने चेन्नई ला हरवले आहे. एका सिझन मध्ये RCB ने चेन्नई ला आपल्या होम ग्राउंड आणि चेन्नई च्या होम ग्राउंड वर हरवले होते.. त्यामुळे या Southern derbi मध्ये आज कोण बाजी मारेल हे पाहणे औचित्याचे ठरेलं.

चिन्नस्वामी स्टेडियम वर नेहमीच मोठे स्कोर होतात, षटकारांची अतिशबाजी होते. आज दोन्ही टीम्स प्रेक्षकांनाचे मनोरंजन करणार हे नक्की!!

निष्कर्ष

आजचा सामना चेन्नईसाठी ‘करो या मरो’ असा असेल. जर त्यांना स्पर्धेत पुनरागमन करायचे असेल, तर त्यांना आरसीबीच्या बालेकिल्ल्यात जाऊन विजय मिळवावा लागेल. तर आरसीबी आपला विजयाचा रथ कायम राखण्याचा प्रयत्न करेल.

तुमच्या मते आज कोण जिंकणार? कमेंटमध्ये नक्की सांगा!