आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू झाला असून क्रिकेट चाहत्यांना एकापाठोपाठ एक थरारक सामने पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक) घरच्या मैदानावर खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला पंजाब किंग्सविरुद्ध ५ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला. २०९ धावांचा डोंगर उभा करूनही ‘डॅडीज आर्मी’ ते ‘यंग आर्मी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेन्नईला हा सामना वाचवता आला नाही.
नेमकी कुठे माशी शिंकली? चेन्नईच्या हातातील सामना पंजाबने कसा हिसकावून घेतला? या पराभवामागची ५ प्रमुख कारणे काय होती? यावर आपण आजच्या ब्लॉगमध्ये प्रकाश टाकणार आहोत.
१. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ची रणनीती उलटली
कर्णधार ऋतूराज गायकवाडने सामन्यानंतर स्पष्ट कबुली दिली की, इम्पॅक्ट प्लेयरचा चुकीचा वापर चेन्नईला महाग पडला. फलंदाजी करताना कार्तिक शर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरवले, पण तो अवघ्या १ धावेवर बाद झाला. त्यानंतर गोलंदाजीच्या वेळी राहुल चहरला पाचारण केले गेले, मात्र त्याने ४ ओव्हर्समध्ये ४६ धावा लुटवल्या. ही रणनीती चेन्नईसाठी ‘बॅकफायर’ ठरली.
२. प्रियांश आर्यची वादळी सुरुवात
पंजाब किंग्सच्या विजयाचा पाया सलामीवीर प्रियांश आर्यने रचला. अवघ्या ११ चेंडूत त्याने ३९ धावांची तुफानी खेळी केली. त्याने खलील अहमद आणि मॅट हेन्री सारख्या अनुभवी गोलंदाजांना लक्ष्य केले. पहिल्या ४ ओव्हर्समध्येच पंजाबने ५० धावांचा टप्पा ओलांडला होता, ज्यामुळे धावगतीचे दडपण त्यांच्यावर राहिले नाही.

३. मधल्या षटकांत कमकुवत गोलंदाजी
चेन्नईच्या गोलंदाजांना मधल्या षटकांमध्ये पंजाबच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करता आला नाही. श्रेयस अय्यरने संयमी पण आक्रमक ५० (२९ चेंडू) धावांची खेळी करत पंजाबचा डाव सावरला. जेव्हा धावगती ११ च्या वर जाणे अपेक्षित होते, तेव्हा चेन्नईच्या गोलंदाजांनी एकेक बाउंड्री बहाल केली, ज्यामुळे पंजाबला मोमेंटम मिळत गेला.

४. संजू सॅमसन आणि ऋतूराजची संथ फलंदाजी?
चेन्नईसाठी युवा खेळाडू आयुष म्हात्रेने ७३ (४३) धावांची जबरदस्त खेळी केली, पण दुसऱ्या बाजूला अनुभवी संजू सॅमसन (७ धावा) पुन्हा एकदा अपयशी ठरला. कर्णधार ऋतूराज गायकवाडने २८ धावा केल्या, पण त्यासाठी त्याने २२ चेंडू घेतले. टी-२० क्रिकेटमध्ये आणि विशेषतः चेपॉक सारख्या खेळपट्टीवर जिथे धावांचा पाठलाग सोपा होतो, तिथे सलामीच्या जोडीकडून थोड्या अधिक वेगाने धावा अपेक्षित होत्या.

Turning पॉईंटस :
- Middle ओव्हर कंट्रोल : PBKS ने मॅच च्या मधल्या फेज मध्ये CSK ला बांधून ठेवले. रेगुलर interval मध्ये विकेट्स घेतल्या. फटकेबाजी वर अंकुश ठेवला त्यामुळे एकवेळ 220-230 वाटणारा स्कोर 209 वर थांबला.
- Death ओव्हर फिनिश: आयुष म्हात्रे च्या विकेट नंतर धावगती मंदावली. सर्फराज खान आणि शिवम दुबे ने फटकेबाजी केली पण शेवटच्या काही ओव्हर्स मध्ये CSK ला धावगती वाढवायला जमली नाही.
- CSK ची बॉलिंग : PBKS ने चेन्नई च्या बॉलर्स ची पहिल्या ओव्हर पासून धुलाई केली. त्यामुळे चेन्नई powerplay मध्येच बॅकफुट ला गेली. मधल्या षटकामध्ये सुद्धा त्यांचे स्पिन्नर्स अपयशी ठरले. नूर अहमद आणि राहुल चहर ला एकही विकेट घेता आली नाही आणि दोघांनी मिळून जवळपास 84 रन्स दिले. बाकीचे बॉलर्स सुद्धा अपयशी झाले.
- ऋतुराज ची कॅप्टन्सी : ऋतुराज वर आता कॅप्टन्सी चा दबाव दिसू लागला आहे. बॉलर चे रोटेशन, चुकीची फील्ड प्लेसमेंट, शिवम दुबे किंवा ऑल राऊंडर असलेल्या प्रशांत वीर ला बॉलिंग न देणे. आक्रमक फील्ड सेट करून बॅट्समन वर दबाव आणण्यात त्याला अपयश आले.
निष्कर्ष:
चेन्नई सुपर किंग्ससाठी हा धोक्याचा इशारा आहे. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी होत असली तरी, गोलंदाजी आणि डेथ ओव्हर्समधील रणनीतीमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. चेन्नई ला त्यांच्या ओपनर्स कडून सुद्धा म्हणावी तशी सुरुवात मिळत नाहीये. याकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्सने टेबलवर अव्वल स्थान पटकावून इतर संघांना सावध केले आहे.
तुम्हाला काय वाटते, चेन्नईच्या पराभवाचे मुख्य कारण काय होते? कमेंट्समध्ये नक्की सांगा!