
आयपीएलचे वेड पुन्हा एकदा सर्वांच्या डोक्यावर चढले आहे! २०२६ च्या सीझनची सुरुवात धमाकेदार झाली असून, आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या म्हणजे चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यावर. एका बाजूला पाचवेळा चॅम्पियन राहिलेला चेन्नईचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला पहिल्या आयपीएलचा मानकरी राजस्थान रॉयल्स.
आजच्या या ब्लॉगमध्ये आपण या दोन्ही संघांच्या ताकदीचा, कमतरतांचा आणि ‘हेड टू हेड’ रेकॉर्डचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
सामन्याचा तपशील (Match Details)
•तारीख: ३० मार्च २०२६, सोमवार
•वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
•ठिकाण: बारसापारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी (आसाम)
गुवाहाटीचे हे मैदान राजस्थान रॉयल्सचे ‘सेकंड होम ग्राउंड’ मानले जाते. येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन असते, पण संध्याकाळी पडणारा दव (Dew factor) नाणेफेक जिंकणाऱ्या संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
आमनेसामने: हेड टू हेड परिस्थिती (Head-to-Head Record)
IPL इतिहासात जेव्हा जेव्हा हे दोन संघ भिडले आहेत, तेव्हा सामना अटीतटीचा झाला आहे. आकडेवारीवर नजर टाकली तर:
एकूण सामने: 31
CSK विजय: 16
RR विजय: 15
हो, तुम्ही बरोबर वाचलंत! दोन्ही संघ जवळपास बरोबरीत आहेत. मात्र, गेल्या ५-६ सामन्यांचा विचार केला, तर राजस्थानने चेन्नईवर आपले वर्चस्व गाजवले आहे. २०२५ च्या सीझनमध्ये देखील राजस्थानने चेन्नईला 2 वेळेस पराभूत केले होते. त्यामुळे मानसिकदृष्ट्या राजस्थानचा आत्मविश्वास थोडा जास्त असेल.

दोन्ही संघांमधील ‘Key Players’ (खेळाडू ज्यांच्यावर लक्ष असेल)
चेन्नई सुपर किंग्स (CSK):
ऋतुराज गायकवाड: कर्णधार ऋतुराजवर संघाला मोठी सुरुवात करून देण्याची जबाबदारी असेल. त्याची सातत्यपूर्ण फलंदाजी चेन्नईसाठी कणा आहे. ऋतुराज चा प्लस पॉईंट आहे कि तो मॅच च्या कोणत्याही क्षणाला आपल्या खेळाचा गिअर बदलू शकतो आणि हेच CSK साठी महत्वाचे ठरणार आहे.
संजू सॅमसन: राजस्थान सोडून चेन्नईत आलेल्या संजूसाठी हा सामना भावनिक असेल. माजी संघाविरुद्ध तो कशी फटकेबाजी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. तसेच संजू हा आपला वर्ल्ड कप मधील जबरदस्त फॉर्म घेऊन आला आहे त्यामुळे CSK ला त्याच्या कडून खूप अपेक्षा आहेत. तसेच MS धोनी च्या अनुपस्थिती मध्ये त्याच्यावर विकेट कीपिंग सुद्धा जबाबदारी असेल.

नूर अहमद: अफगाणिस्तानचा हा फिरकीपटू मधल्या षटकांमध्ये धावा रोखण्यासाठी आणि विकेट्स काढण्यासाठी चेन्नईचे मुख्य अस्त्र असेल.
तसेच शिवम दुबे, आयुष म्हात्रे, सर्फराज खान यासारखे हार्ड हिटिंग ऑप्शन सुद्धा चेन्नई कडे आहेत तसेच खलील अहमद, मुकेश चौधरी, ओव्हरटर्न सारखे फास्ट bowling ऑप्शन सुद्धा आहेत.
राजस्थान रॉयल्स (RR):
यशस्वी जयस्वाल: पॉवरप्लेमध्ये विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी जयस्वाल प्रसिद्ध आहे. जर तो १० षटके टिकला, तर धावांचा डोंगर उभा राहू शकतो.
रियान पराग: या सीझनमध्ये राजस्थानचे नेतृत्व रियान परागकडे आहे. घरच्या मैदानावर (गुवाहाटी) खेळताना त्याला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळेल.
रवींद्र जडेजा: चेन्नईची साथ सोडून आता ‘रॉयल’ झालेल्या जडेजाची फिरकी आणि फटकेबाजी चेन्नईला जड जाऊ शकते. संजू साठी हा सामना जसा भावनिक असेल तसाच जडेजा साठी सुद्धा हा सामना भावनिक असेल.
वैभव सूर्यवंशी, हेटमायर सारखे तगडे बॅट्समन त्यांच्या कडे आहेत तसेच जोफ्रा आर्चर सारखा अनुभवी बॉलर त्यांच्या कडे आहे. रवी बिष्णोई च्या लेग स्पिन चा धोका सुद्धा चेन्नई ला आहे.
कोणाचे पारडे जड आहे? (Match Prediction)
कागदावर दोन्ही संघ अत्यंत संतुलित वाटत आहेत. चेन्नईकडे अनुभवी खेळाडूंची फळी आहे, तर राजस्थानकडे युवा आणि आक्रमक खेळाडूंचा भरणा आहे.
राजस्थानचा फायदा: घरचे मैदान आणि गेल्या काही सामन्यांमधील चेन्नईविरुद्धचा त्यांचा रेकॉर्ड. तसेच जोफ्रा आर्चरचे पुनरागमन त्यांची गोलंदाजी मजबूत करते.
चेन्नईचा फायदा: संजू सॅमसन आणि ऋतुराज यांची जोडी कोणत्याही गोलंदाजीला फोडून काढू शकते. तसेच CSK ने यावेळी युवा प्लेयर्स वर केलीली गुंतवणूक आणि अनुभवी प्लेयर्स यांच्यामुळं टीम संतुलित आहे पण युवा ऑल राऊंडर प्लेयर्स कडे लक्ष नक्कीच असेल.
निष्कर्ष:
जर गुवाहाटीमध्ये दव पडले, तर टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करणारा संघ फायद्यात राहील. सध्या तरी राजस्थान रॉयल्सचे पारडे थोडे जड वाटत आहे. पण क्रिकेट हा असा खेळ आहे आणि त्यात हा T20 चा फॉरमॅट कधीही काहीही होऊ शकते. त्यामुळे क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना एक high voltage सामना नक्कीच बघायला मिळेल यात शंका नाही.
CSK आणि RR मधील लढत ही नेहमीच रणनीती आणि कौशल्याची लढाई असते. ऋतुराज गायकवाड विरुद्ध रियान पराग अशी ही यंग ‘कॅप्टन्सी वॉर’ प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल. तुम्हाला काय वाटते? आज बाजी कोण मारणार? ‘व्हिसल पोडू’ की ‘हल्ला बोल’? कमेंट्समध्ये नक्की सांगा!