CSK vs RR IPL 2026 Analysis: गुवाहाटीत राजस्थानचा ‘रॉयल’ धमाका; सूर्यवंशी च्या वादळापुढे चेन्नई नतमस्तक!

IPL 2026 चा थरार आता खऱ्या अर्थाने रंगू लागला आहे. आज गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडियमवर पाचवेळा चॅम्पियन राहिलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि घरच्या मैदानात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित होती. मात्र, राजस्थानच्या गोलंदाजांनी आणि १५ वर्षीय युवा खळबळ ‘वैभव सुर्यवंशी’ने या सामन्याचे पूर्णपणे एकतर्फी युद्धात रूपांतर केले. राजस्थानने चेन्नईचा ८ गड्यांनी धुव्वा उडवत हंगामाची दणक्यात सुरुवात केली आहे.

Vaibhav Sooryvanshi

चेन्नईची फलंदाजी पत्त्यासारखी कोसळली

नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य ठरवला. चेन्नईची सुरुवात अतिशय खराब झाली. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि संघात मोठा ट्रेड होऊन आलेला संजू सॅमसन हे दोघेही स्वस्तात (प्रत्येकी ६ धावा) बाद झाले.


राजस्थानच्या नांद्रे बर्गर आणि जोफ्रा आर्चर या जोडीने चेन्नईच्या टॉप ऑर्डरला सळो की पळो करून सोडले. एकेकाळी चेन्नईची अवस्था ४ बाद ४१ अशी होती. जेमी ओव्हरटनने (४३ धावा) एकाकी झुंज दिली, पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळाली नाही. परिणामी, संपूर्ण चेन्नईचा संघ १९.४ षटकात अवघ्या १२७ धावांवर गारद झाला.

Sanju Samson

वैभव सुर्यवंशी: आयपीएलच्या इतिहासातील नवीन ‘वंडर बॉय’

Vaibhav Sooryvanshi 52(17)

१२८ धावांचे माफक आव्हान घेऊन उतरलेल्या राजस्थान रॉयल्ससाठी १५ वर्षांच्या वैभव सुर्यवंशीने जे काही केले, ते पाहून अवघ्या क्रिकेट विश्वाचे डोळे विस्फारले. सुर्यवंशीने अवघ्या १५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ५२ धावांच्या खेळीत ५ उत्तुंग षटकार आणि ४ चौकार लगावले.
यशस्वी जैस्वालने (३८*) त्याला संयमी साथ दिली. चेन्नईच्या गोलंदाजांकडे सुर्यवंशीच्या आक्रमकतेचे कोणतेही उत्तर नव्हते. राजस्थानने हे लक्ष्य १२.१ षटकातच पूर्ण केले, ज्यामुळे त्यांच्या Net Run Rate मध्ये मोठी वाढ झाली आहे.

सामन्याचे टर्निंग पॉइंट्स (Match Analysis)

1.पॉवरप्लेमधील पडझड: चेन्नईने पहिल्या ६ षटकांतच आपल्या महत्त्वाच्या ४ विकेट्स गमावल्या. येथूनच चेन्नई सामन्यातून बाहेर गेली. सुरुवातीला कंडिशन बॉलर्स च्या बाजूने असल्याने CSK बॅट्समन ला धीर धरून खेळणे गरजेचे होते परंतु poor shot selection मुळे CSK च्या बॅटिंग ला उतरती कळा लागली.

२. रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी: राजस्थानकडून खेळताना जडेजाने आपल्या जुन्या संघाविरुद्ध ३ षटकात १८ धावा देऊन २ महत्त्वाचे बळी घेतले. त्याने पहिल्यांदा सर्फराज खान ला आणि त्याच ओव्हर मध्ये स्फोटक शिवम दुबे ला आऊट करून CSK च्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आणल्या.

३. सुर्यवंशीचा अटॅक: सुरुवातीलाच चेन्नईच्या गोलंदाजांवर दबाव टाकल्यामुळे राजस्थानने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. 15 वर्षीय या पोराने CSK च्या कोणत्याच बॉलर ला जम बसू दिला नाही. प्रत्येक शॉट मध्ये त्याचा कॉन्फिडन्स दिसून येत होता.

Ravindra Jadeja 2-18

IPL 2026 Points Table: राजस्थान अव्वल स्थानी

Royals 🔥

या मोठ्या विजयानंतर राजस्थान रॉयल्स आता गुणतालिकेत +४.१७१ च्या नेट रनरेटसह पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे. तर दुसरीकडे, चेन्नईसाठी हा पराभव मोठा धक्का असून त्यांना आपल्या फलंदाजीच्या क्रमावर गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

निष्कर्ष (Conclusion)

आजचा सामना हा अनुभवापेक्षा युवा रक्ताच्या जोशाचा ठरला. राजस्थानसाठी हा विजय आत्मविश्वास वाढवणारा आहे, तर धोनीच्या अनुपस्थितीत (दुखापतीमुळे) मैदानात उतरलेल्या चेन्नईला आपल्या रणनीतीत बदल करण्याची गरज आहे. आयपीएल २०२६ आता अधिकच रंजक होणार हे नक्की!